प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
पाली/बेणसे
पाली खोपोली राज्य महामार्गावर चिवे गावाचे कमानी जवळ मोटारसायकलचा जोरदार अपघात झाला असून या अपघातात मोटारसायकलवरील खवली येथील दोघे तरुण गंभीर जखमी झाले आहेत.
पाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाली खोपोली राज्य महामार्गावर चिवे गावाचे कमानी जवळ पिकअप जीप क्रमांक एम एच 14 एच जी 94 31 हे वाहन चालक शांताराम नारायण शेळके हे खोपोली पाली रोडने खोपोली बाजूकडे चिवे गावाच्या हद्दीत कमानी जवळ आले असता चिवे गावाकडून येणारी एक मोटार सायकल एम एच 06 सी ई 3313 ही अचानक रस्त्यावर आल्याने पिकअप चे समोरील बंपरला ठोकरून अपघात झाला. सदरची पिकअप ही उजवे बाजूला घेतल्याने उजवी साईड पट्टी असलेल्या खड्ड्यात जाऊन एक बाजूस पलटी होऊन हा अपघात झाला असून या अपघाताची नोंद पाली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या अपघातामधील जखमीं तरुणांना पाली प्राथमिक उपचार केंद्रात आणण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी एमजीएम रुग्णालय पनवेल येथे दाखल करण्यात आले आहे.
या घटनेचा पुढील तपास पाली पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार शिर्के हे करीत आहेत.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या