ब्रेकफेल होऊन एसटी बसचा अपघात

सात प्रवासी जखमी,एस.टी.बसचे नुकसान
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
पाली/बेणसे

सुधागड तालुक्यातील महागाव फाट्यावर सेरेनिटी फॉर्महाऊस जवळ खेमवाडी पेण या एसटी बसचा ब्रेक फेल होऊन अपघात झाला. हा अपघात मंगळवारी (ता.27) सकाळी नऊ वाजताच्या सुमारास झाला. बसमध्ये 13 प्रवासी होते. त्यामधील 7 प्रवासी जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. एसटी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या बसचा क्रमांक एम एच 07 सी 7488 हा आहे. या अपघातातील जखमींना पाली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले आहे.