प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
वीज वितरण कंपनीच्या तंत्रज्ञाला कनेक्शन का तोडले म्हणून शिवीगाळ करून धमकी दिल्याप्रकरणी व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी सरगरवस्ती,तळेवाडी येथील एकावर आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत आटपाडी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दि. २५ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सरगरवस्ती, तळेवाडी येथे विश्वास दादासाहेब मारगुडे (रा.सरगरवस्ती, तळेवाडी ता.आटपाडी) यानी त्यांचे वडील दादासाहेब भोजा म्हारगुडे यांच्या नावे असलेले वीज कनेक्शन का तोडले? असे म्हणून बाकी गावातील सर्व थकबाकीदारांची वीज कनेक्शन तोडणार आहात का? असे म्हणून राधेशा कृष्णा शेरकुरे या महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या तंत्रज्ञास व त्यांच्यासोबत असलेल्या कर्मचारी यांना शिवीगाळ केली, तुम्ही कोठे राहायला आहे हे मला माहित आहे, असे म्हणून त्यांना तसेच शिवाजी तुकाराम शेंडगे यांना तुम्हाला करगणीत येऊन ठार मारीन अशी धमकी देऊन तुम्ही बाकी गावातील कनेक्शन कसे तोडतात ते बघतोच, असे म्हणत शेरकुरे यांच्या अंगावर धावून आले. शासकीय कामात अडथळा आणले व दमदाटी केल्याबाबतची फिर्याद त्यांनी दिली आहे. याप्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील करीत आहेत.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या