माळशिरस तालुका प्रतिनिधी/ संजय हुलगे :
पोलीस वसाहतीची गेली दहा वर्षापासून दुरवस्था झाली असून पोलिसांच्या या प्रश्नाकडे अधिकारी,लोकप्रतिनिधी यांचे लक्ष नसल्यामुळे पोलिसांचा पोलीस वसाहतीचा प्रश्न गंभीर झाला आहे.
माळशिरस हे तालुक्याचे ठिकाण असून या ठिकाणी जिल्हा न्यायालयसह इतर न्यायालये आहेत. पूर्वी तालुक्यात माळशिरस हे एकमेव पोलीस स्टेशन होते.या ठिकाणी पोलिस कर्मचारी यांना राहण्यासाठी मोठी चाळ व अधिकारी यांना राहण्यासाठी बंगले होते.
गेले १० ते १२ वर्षापासून या पोलीस वसाहतीची दुरवस्था झाली आहे .या ठिकाणच्या सर्व खोल्याची पडझड झाली आहे.त्यामुळे या ठिकाणी १० ते १२ वर्षापासून कोणीही रहात नाही .या ठिकाणी नवीन वसाहत बांधण्यासाठी आराखडा करण्यात आला होता. परंतु आराखड्यास उशिरा मंजुरी मिळाल्याने त्याचे मुल्याकन वाढले.त्यामुळे हा प्रश्न प्रलंबित राहिला आहे.
वास्तविक पाहत शासन अधिकारी, कर्मचारी यांना कामाच्या ठिकाणी रहा असे सांगते.परंतु त्यांच्या निवासाबाबत कोणतीही उपाय योजना करीत नाही.त्यामुळे याठिकाणी असणाऱ्या ५० ते ५५ कर्मचाऱ्यांना गावात,परगावी रहावे लागत आहे.वास्तविक पाहता सुरेक्षा प्रश्नाच्यादृष्टीने पोलीस हे कार्यालयाच्या नजीकच रहावयास असणे आवश्यक आहे.परंतु पोलिसांच्या या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधी,अधिकारी लक्ष देत नसल्याने पोलिसांना त्रास सहन करावा लागत आहे .वास्तविक पाहता माळशिरस पोलीस वसाहतीची सुमारे ४ ते ५ एकर जागा आहे.केवळ बांधकाम होणे आवश्यक आहे.याउलट याच ठिकाणी असणाऱ्या आरोग्य केंद्राच्या ठिकाणी मोठे रुग्णालय नव्याने बांधण्यात आहे.त्याच्या कर्मचारी व अधिकारी यांच्या निवासासाठी इमारत बांधली जात आहे.त्यासाठी निधी उपलब्द्ध केला जातो.मग पोलीस वसाहतीलाच निधी का दिला जात नाही?हा खरा प्रश्न आहे .या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी जनतेतून होत आहे.


संबंधित बातम्या
मोठी उपेक्षा पदरी आलेले खानापूरचे घरंदाज नेते – कै . किरणरावभैय्या माने
दै.प्रगल्भनायक,दि.04/06/2023 रोजीचा अंक
दै.प्रगल्भनायक,दि.03/06/2023 रोजीचा अंक