एनयुजे महाराष्ट्र अध्यक्ष शीतलताई करदेकर राहणार उपस्थित!
१९ आँगस्टला मुंबईत सुनावणी

मुंबई/प्रतिनिधी :
मुंबईतील राजस्थान पत्रिकेच्या ब्युरो कार्यालयात मागील ६ वर्षांपासून कार्यरत ज्येष्ठ पत्रकार रोहितकुमार तिवारी यांना कोणतीही ठोस कारणे न देता देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान काढून टाकण्यात आले. इतकेच नाही तर या लाँकडाऊन दरम्यान राजस्थान पत्रिकाचे व्यवस्थापनही येथील ब्युरो कार्यालय बंद करून पळून गेले. या पत्रिकेचे पत्रकार रोहित तिवारी यांचेवर व्यवस्थापनाने फूल अँन्ड फायनल हिशेब करण्यासाठी दबाव आणला, तर पत्रकार रोहित कुमार तिवारी यांनी महाराष्ट्र कामगार आयुक्तांकडे या प्रकरणी न्याय्य न्याय मिळावा अशी तक्रार केली.
यावर पत्रकार रोहित तिवारी यांना पूर्वीप्रमाणेच पुन्हा कामावर घेण्याबाबत नोटीस पाठविली आहे, त्यात मजीठिया वतन आयोगानुसार थकबाकीचा समावेश आहे.
या प्रकरणाची सुनावणी १९ ऑगस्ट रोजी वांद्रे येथील कामगार आयुक्त कार्यालयात घेण्यात येणार आहे.
दरम्यान, राजस्थान पत्रिकेच्या वतीने उच्च पदाधिकींच्या व्यतिरिक्त, रोहित तिवारी च्या वतीनेनॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्रच्या अध्यक्ष शीतल करदेकर उपस्थित राहणारआहेत.
आम्ही सांगू इच्छितो की , राजस्थान पत्रिकेने आपल्या मुंबई ब्युरोमधील बर्याच लोकांना लाँकडाऊन काळात काढून टाकले आहे.
राजस्थान पत्रिकेला सर्व आवश्यक कागदपत्रे आणि कर्मचार्यांची यादी घेऊन येण्याची सूचना कामगार आयुक्तालयाकडून देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या
मोठी उपेक्षा पदरी आलेले खानापूरचे घरंदाज नेते – कै . किरणरावभैय्या माने
दै.प्रगल्भनायक,दि.04/06/2023 रोजीचा अंक
दै.प्रगल्भनायक,दि.03/06/2023 रोजीचा अंक