आटपाडी/प्रतिनिधी:
कोरोना कालावधी मध्ये विविध उपक्रम राबविले जात आहेत याच पद्धतीने सामाजिक भान ठेवून कोरोना बद्दल विशेष जनजागृती करत आणि घरीच राहा सुरक्षित राहा हा संदेश देत संभाजी पाटील यांनी त्यांचे सामाजिक कार्य कोरोना कालावधीत सुरू ठेवले, याचीच विशेष दखल घेत हाय रेंज बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया रेकॉर्ड्स च्या वतीने संभाजी पाटील यांचा सन्मानपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला.
गेली अनेक वर्षे संभाजी पाटील सामाजिक सेवा करीत आहेत, याद्वारे त्यांनी समाजामध्ये आपली वेगळी छाप सोडली आहे, कोरोना काळात शासनाच्या नियमांचे पालन करीत गोरगरीब लोकांना केलेल्या मदतीची विशेष दखल “हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि इंडिया रेकॉर्ड्स” चे मुख्य न्यायाधीश नितीन गवळी यांनी घेतली आणि त्यांच्या कामाचे कौतुक केले.
नुकतेच हे सन्मानपत्र यांना मिळाल्याने परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.


संबंधित बातम्या
मोठी उपेक्षा पदरी आलेले खानापूरचे घरंदाज नेते – कै . किरणरावभैय्या माने
दै.प्रगल्भनायक,दि.04/06/2023 रोजीचा अंक
दै.प्रगल्भनायक,दि.03/06/2023 रोजीचा अंक