आटपाडी एसटी स्थानकाच्या शौचालयात तरुणाचा मृत्यू!

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

आटपाडी येथील एसटी बस स्थानकाच्या शौचालयात प्रवीण उर्फ पिंटू अशोक जाधव (वय ३६ रा. विठ्ठलनगर, आटपाडी) याचा मृतदेह गुरुवारी सकाळी सापडला. याबाबतची माहिती आटपाडी एसटी डेपोचे वाहतूक अधीक्षक संजय शिवराम माने यांनी आटपाडी पोलिसांना कळवली आहे.
याबाबत आटपाडी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आटपाडी येथील आज गुरुवार दि.१५ रोजी सकाळी १०.२५ वाजण्याच्यापूर्वी प्रवीण उर्फ पिंटू अशोक जाधव एसटी बस स्थानकाच्या संडास बाथरूममध्ये आतून कडी लावून नाका-तोंडातून रक्त येऊन मयत अवस्थेत पडलेले आढळले. याबाबतची माहिती वाहतूक अधीक्षक माने यांनी फोनद्वारे आटपाडी पोलिसांना कळवली. आटपाडी पोलिसांनी मयताच्या नातेवाईकांचा शोध घेऊन आटपाडी ग्रामीण रुग्णालय येथे शिवविच्छेदन करून मृतदेह त्यांचा भाऊ पवनकुमार अशोक जाधव यांच्या ताब्यात दिले.या घटनेची नोंद आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये झाली आहे. याबाबत पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांनी पोलीस हवालदार गारळे व कदम यांना तपासासाठी रवाना केले.