चोरीच्या रिक्षा विकून फसवणूक करणार्‍या टोळीचा माणगावात पर्दाफाश

१२ ऑटो रिक्षा जप्त,३ आरोपींना अटक,टोळीचे मुंबईत कनेक्शन
माणगाव पोलिसांची धड़ाकेबाज कामगिरी

धम्मशील सावंत
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
रायगड
मुंबई कनेक्शन असणार्‍या चोरीच्या रिक्षा विकून फसवणूक करणार्‍या टोळीचा माणगावात पर्दाफाश झाला असून एकूण 12 ऑटो रिक्षा पोलिसांनी जप्त केल्या आहेत या गुन्ह्याप्रकरणी माणगावमधील 1 व मुंबईतील 2 अशा एकूण 3 आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
सदर गुन्ह्यामध्ये आतापर्यंत अमित सुरेश बुटे रा.उतेखोलवाडी ता.माणगाव, केतन राजू जाधव रा.ऐरोली नवी मुंबई,अतिष दिलीप पाटील रा.राबाडे गाव नवी मुंबई यांना अटक करण्यात आली आहे.या गुन्ह्याप्रकरणी माणगावात एकूण किंमत 4 लाख 34 हजार मूळ किंमत 12 लाख एवढ्या किंमतीच्या 12 रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. सदरची ही यशस्वी कामगिरी आपल्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिष आस्वर,पोलीस हवालदार रावसाहेब कोळेकर,पोलीस नाईक अल्पेश पवार,पोलीस शिपाई अनिल रिठे,पोलीस शिपाई अमोल पोंधे,पोलीस शिपाई नाथा दहिफळे,पोलीस शिपाई संजीव सुरवसे,पोलीस शिपाई निखिल सूर्ते यांच्या पथकाने केली. माणगाव पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.