माळशिरस तालुक्यातून १९ जणांना हद्दपार !

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माळशिरस

गणेश उत्सवाच्या अनुषंगाने माळशिरस पोलीस ठाणेकडून अवैध धंदे व गुन्हेगारी पार्श्वभुमी असणाऱ्या १९ लोकांना गणेशोत्सव कालावधीत तालुक्यातुन हद्दपार करण्यात आले आहे.
गणेश उत्सव २०२२ च्या अनुषंगाने माळशिरस पोलीस ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येत आहे. पोलीस ठाणे हद्दीत एकुण ११६ गणेश मंडळांची स्थापना करण्यात आलेली आहे. सर्व उत्सव मंडळांना पोलीस ठाणेकडुन आँनलाईन परवानगी देण्यात आली आहे. पोलीस ठाणे हद्दीतील सर्व सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांच्या पदाधिकारी यांच्या गावोगावी तसेच पोलीस ठाणेस मिटींग झालेल्या आहेत. तसेच गणेश उत्सव शांततेत व सामाजिक उपक्रम राबवुन पर्यावरण पुरक व डॉल्बीमुक्त साजरा करणेबाबत आवाहन करणेत आले आहे.
गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडावा व या कालावधीमध्ये पोलीस ठाणे हद्दीमध्ये कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये, म्हणुन माळशिरस पोलीस ठाणेकडुन अवैध दारु विक्री करणारे व गणेशोत्सव कालावधीत गुन्हे दाखल असणारे व गुन्हेगारी पार्श्वभुमी असणारे पोलीस ठाणे हद्दीतील १९ लोकांना माळशिरस तालुक्यातुन हद्दपार करण्यात आले आहे.