माळशिरस येथे महिलांना तुळशी वाटप व विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती भेट

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माळशिरस

सहकार नगरचा राजा मित्र मंडळ सहकार नगर माळशिरस या ठिकाणी माळशिरसचे नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख यांच्या शुभ हस्ते श्री ची आरती झाली व सहकार नगर मधील सर्व माता-भगिनींना तुळशी वाटप व विठ्ठल रुक्मिणी मूर्ती देण्यात आली. 6 सप्टेंबर 2022 राष्ट्रीय पुरस्कृत विजेते ह भ प शिवाजी महाराज शेळके यांचे भारुड झाले व वार गुरुवार दिनांक 8 सप्टेंबर 2022 रोजी ह भ प अमोल महाराज सुळ यांचे सुश्राव्य कीर्तन सोहळा होणार आहे. आयोजक सुमितभाऊ जानकर ( युवा उद्योजक ) अध्यक्ष -आकाश घाडगे उपाध्यक्ष-निलेश पवार खजिनदार-जिगर भोना व मंडळातील सर्व सदस्य. मंडळातील सदस्यांनी मा. आप्पासाहेब देशमुख यांनी केलेल्या माळशिरस मधील विकास कामा बद्दल आप्पासाहेब देशमुख यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी मंडळातील सर्व सदस्य सादिक भैय्या पठाण तोहित पठाण सुशील गोसावी अमन पठाण आकाश पवार अभिजीत शेंबडे मंदार बनकर नाना बाबर शैलेश वाघमोडे विक्रम घाडगे सुनील पवार अमोल चव्हाण किरण काळे अनिल देशमुख सचिन घोळवे फारुख शेख सद्दाम मनेरी अरुण सासणे अमित तोडकर सोहेल पठाण काळू घाडगे व नगरसेवक वैभव जानकर उपस्थित होते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव याप्रसंगी मंडळाने राबवलेले उपक्रम
१)गरजू नागरिकांना दिवाळी गोड करण्यासाठी दिवाळी सणाचा बाजार मोफत.
२)सहकार नगर मधील गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय शैक्षणिक सर्व खर्च मोफत.
3)सरकार नगर मधील मुलीच्या लग्नासाठी प्रत्येकी दहा हजार रुपये अंदन.