संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माळशिरस
माळशिरस येथील सुप्रसिद्ध डॉ. मच्छिंद्र भगवान गोरड यांचा वाढदिवस माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगरसेवक रणजितशेठ मोटे व मित्र परिवार यांच्यावतीने माळशिरस येथील सुमन बंगला या निवासस्थानी शाल, श्रीफळ, फेटा व हार घालून आणि केक कापून साजरा करण्यात आला.
यावेळी माजी नगरसेवक रणजित मोटे, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर संजयअण्णा मोटे, भांबुर्डी ग्रामपंचायत सदस्य रवितात्या मोटे, युवा नेते प्रदीप मोटे आदी मोटे परिवारांसह ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक भगवानराव थोरात, माजी नगरसेवक उद्योजक संतोषआबा वाघमोडे, सुरेशआबा वाघमोडे, भाजपचे माजी अध्यक्ष पांडुरंगतात्या वाघमोडे, बाळासो निकम, यशवंत मोहिते, सोमनाथ सरगर, दीपक टेळे, अमर पठाण, हॉलीबॉलचे कर्णधार बाळासाहेब मुजावर, लक्ष्मण वाघमोडे, वाहिद इनामदार आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद