येळवीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रतिष्ठानच्या वतीने शिक्षकांचा सत्कार

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत

शिक्षक दिनाचे औचित्य साधून जत तालुक्यातील येळवी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रतिष्ठानच्या वतीने ६५ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रतिष्ठानच्या वतीने येळवी येथील तिन्ही जिल्हा परिषद मराठी शाळा, श्री समर्थ शिवप्रभू हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज, ओंकारस्वरूपा न्यू इंग्लिश मिडीयम व ज्युनिअर कॉलेज, संत ज्ञानेश्वर आश्रमशाळा, कृष्णप्रकाश गुरुकुल, अंगणवाडी सेविका यांचा शाल, हार व भेट वस्तू देवून सत्कार करण्यात आला. शिक्षक दिनानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी येळवीचे उपसरपंच सुनिल अंकलगी, चेअरमन संतोष स्वामी, ओंकारस्वरूपाचे अध्यक्ष दीपक अंकलगी, अष्टविनायकचे अध्यक्ष अविनाश पोरे, प्राचार्य नंदकुमार खंडागळे, भारत निळे, मुख्याध्यापक शहाजी शिंदे, भारत क्षीरसागर, पारेकर, यादव, कृष्णप्रकाश गुरुकुलचे ज्ञानेश्वर आवटे, ए. एम. पिरजादे, प्रवीण तोडकर, राजू कदम, शुभम पोतदार, तानाजी व्हनमाने, दत्ता जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रत्येक शाळेत जावून प्रतिष्ठानने शिक्षकांचा सत्कार करण्याचा आगळावेगळा उपक्रम राबविल्याबदल सर्वांनी कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मारुती मदने यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रतिष्ठानचे गणेश वगरे, संदीप मदने, अमोल आवटे, नवनाथ काळे, संजय सरगर, सुनील गोयकर, पिंटू मदने यांनी केले. आभार नवनाथ काळे यांनी मानले.