प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
आटपाडी तालुक्यातील गळवेवाडी येथील एका विवाहितेने सोमेवाडी येथील सासरच्या लोकांविरुद्ध छळ केल्याची फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सासरच्या तिघाजणांविरुद्ध आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत आटपाडी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सोमेवाडी ता.सांगोला जि.सोलापूर येथील विश्वास विष्णू काळेल, सुलन विष्णू काळेल, विष्णू नारायण काळे यांनी सोमेवाडी, अहमदाबाद (गुजरात) व गळवेवाडी येथे वेळोवेळी छळ केला असल्याबाबतची फिर्याद विवाहितेने दिली आहे. पती विश्वास याने दारू पिऊन येऊन विवाहितेस गॅरेजचे व लग्नाचे कर्ज झाले आहे, बहिणीचे लग्न करायचे आहे, असे म्हणून सहा लाख ५० हजार रुपये तिच्या वडिलांकडून देऊनही तिला लाथाबुक्यांनी मारहाण, शिवीगाळ केली, अहमदाबाद येथे रात्री विश्वास व सुलन या दोघांनी घराचा दरवाजा व खिडक्या बंद करून सुलन दोन्ही पाय पकडून विश्वासने गळा आवळून शिवीगाळ करून दोन दिवस उपाशी ठेवले. तसेच विष्णू याने तू तुझ्या पतीचे व सासूचे का ऐकत नाही, तु तुझ्या अजून राहिलेले कर्ज भागवण्यासाठी वडिलांकडून तेरा लाख रुपये घेऊन ये,तरच तुला आम्ही नांदवेल असे म्हणून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला, अशा स्वरूपाची फिर्याद आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये विवाहितेने दिली आहे. याबाबतचा तपास पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या आदेशाने पोलीस हवलदार शेजाळ करीत आहेत.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या