
नंदकुमार विभुते
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माडगुळे
माडगुळे येथील रहिवाशी असणाऱ्या महिलांसाठी माडगुळकर उद्योग समूहाचे अध्यक्ष व ग्रामपंचायतचे सदस्य अमोल (शेठ) विभुते यांनी गौराई सजावट स्पर्धा आयोजित केल्या होत्या.त्या आज संपन्न झाल्या.
माडगुळकर उद्योग समूहाचे अध्यक्ष अमोलशेठ विभुते यांच्यामार्फत वर्षभरात गावात वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गावातील महिलांनी गौराईचा सण हा उत्साहात साजरा करावा, यासाठी गौराई सजावट स्पर्धा आयोजित केली होती.आपल्याच गावातील जास्तीत जास्त महिलांनी स्पर्धेत भाग घ्यावा,पारंपारिक चालीरीती मोडून नवीन युगाप्रमाणे त्यांनी जगावे,चुल आणि मुल एवढेच आपले जग न मानता त्यानी समाजात पुढे येऊन ताटमानेने जगावे, आपण शिकून वेगवेगळ्या पदांवर काम करावे, आपले घर उच्च शिक्षित बनवावे, हेच एक उद्दिष्ट या महिलांसाठी स्पर्धा आयोजन करण्या पाठीमागे आहे. हे ओळखून त्यानी या स्पर्धेचे आयोजन केले.
आज १५ महिलांनी या स्पर्धेत भाग घेतला.त्यात सौ.पल्लवी पवनकुमार विभुते,सौ. शितल सचिन विभुते,सौ.संगिता सुभाष विभुते,सौ.संगिता शिवाजी रेड्डी, सौ.संगिता विठ्ठल गवळी, सौ.रेश्मा प्रसाद गुरव,सौ.ऐश्वर्या रुपेशकुमार गुळीग, सौ.ज्योती अरुण कुलकर्णी,सौ.जयश्री प्रमोद विभुते, सौ.सुवर्णा भाऊसो लिंगडे, कु.शितल सुरेश राक्षे, सौ.पल्लवी तानाजी लिंगडे, सौ.स्वाती सचिन कंडरे, सौ.विद्या वैभव विभुते, सौ.ललिता बाळासाहेब विभुते या महिलांनी या स्पर्धेत भाग घेतला.यामधून या स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांक निवडले जाणार असून एक उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात येणार आहे. यासाठी दै.’प्रगल्भनायक’चे संपादक लक्ष्मणराव खटके, सम्यक-जीवन फिल्म्स अँड म्युझिक रेकॉर्डिंग स्टुडिओचे संस्थापक सचिन वाघमारे यांनी या स्पर्धेतील प्रत्येक सजावटदृश्य भेट देऊन परीक्षण केले. तसेच गायक नरेंद्र दिक्षीत,बळीराजा फाउंडेशनचे अध्यक्ष भाई शिवराम मासाळ,ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सल्लागार कवी अरविंद चांडवले, संपादक पी.एस.पांढरे यांच्यामार्फत या स्पर्धेचे डिजीटल परीक्षण होणार आहे.
प्रथम क्रमांक प्राप्त स्पर्धकाला दोन हजार रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक प्राप्त प्राप्त स्पर्धकाला एक हजार पाचशे रुपये व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक प्राप्त स्पर्धकाला एक हजार रुपये व सन्मानचिन्ह तसेच उत्तेजनार्थ एका स्पर्धकाला पाचशे रुपये व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक स्पर्धकाला सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.


संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद