संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माळशिरस
माळशिरस तालुक्यातील गोरडवाडी येथे गणेश तरुण मंडळाने गेले दोन वर्ष कोरोणा असल्यामुळे गणेश उत्सव साध्या पद्धतीने साजरा केला. यंदा मात्र गणेश उत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जात आहे. गावातील नागरीक मोठ्या संख्येने एकत्रीत येत असतात . येणाऱ्या प्रत्येक लहान थोरांना मंडळाच्या वतीने अन्नदान करण्यात येते . तसेच सांस्कृतिक कार्यक्रम, गजी ढोल ,संगीत खुर्ची ,लिंबू चमचा ,बुद्धिबळ ,आट्या पट्ट्या ,खोखो ,आंधळी कोशिंबीर ,भेंड्या ,किर्तन , भजन ,लगोर असे अनेक प्रकारचे विविध कार्यक्रम मंडळाच्या वतीने राबवले जातात.गणेश तरुण मंडळाच्या सर्व सभासदांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. गणेश भक्तांकडून अन्नदान दरवर्षी केले जाते.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद