प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
बरगेवाडी
गेले दहा वर्ष पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्यामार्फत पर्यावरण पूरक गणेश उत्सव उपक्रम राबवला जात आहे.आपण सर्वांनीच या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवून पर्यावरण पूरक गणेशोत्सव शंभर टक्के यशस्वी करावा असे आवाहन बरगेवाडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका सौ.रेणुका सनगर यांनी केले. त्या पर्यावरण पूरक गणेशोत्सव संदर्भात बोलवण्यात आलेल्या बैठकीमध्ये बोलत होत्या.
आपण आपल्या गावामध्ये पाणी, स्वच्छता, आरोग्यविषयीविविध उपक्रम राबवून लोकसभागातून योगदान दिले आहे.यावर्षी देखील पर्यावरण पूरक गणेशोत्सव उपक्रमामध्ये गावातील ग्रामस्थ,तरुण युवक, सार्वजनिक मंडळाचे सर्व कार्यकर्ते यांनी पुढाकार घेऊन पिण्याचे पाण्याचा स्त्रोत दूषित होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच जमा झालेल्या गणेशमूर्ती व निर्माल्य यांचे व्यवस्थापन करावे, अशा त्यांनी सूचना दिल्या आहेत. तसेच पोलीस पाटील उदय बरगे यांनी सर्वांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवात सहभागी होऊन शंभर टक्के गणेशमूर्ती दान कराव्यात व सार्वजनिक मंडळांनी विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडावी अशा सूचना दिल्या आहेत.
या बैठकीला तंटामुक्त अध्यक्ष मोहन बरगे, जय गणेश तरुण मंडळाचे अध्यक्ष नेताजी बरगे, हनुमान तालीम मंडळाचे अध्यक्ष आदेश बरगे, माजी उपसरपंच सुभाष बरगे,संभाजी बरगे, तसेच मंडळाचे कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते. आभार नामदेव बरगे यांनी मानले.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद