आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रयत्नाला मोठे यश
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माळशिरस
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत फडणवीस सरकार सत्तेवरून गेले आणि राज्यात महाविकास आघाडी नावाने अनैसर्गिक सरकार स्थापन झाले आणि फडणवीस सरकारने दिलेल्या धनगर समाजाच्या २२ योजना रद्द करण्यात आल्या होत्या. गेल्या अडीच वर्षांमध्ये धनगर समाजाच्या उन्नतीसाठी मविका सरकारकडून साधी एक कुठल्याही प्रकारची योजना सुरू करता आली नाही. राज्यात नव्याने घडलेल्या नवीन घडामोडीनंतर नवे शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले आणि धगनर समाजाचा २२ योजनेचा सभागृहात पाठपुरावा करून आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रश्न उपस्थित केला आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवींद्र फडणीस यांनी लगेचं २२ योजना पुन्हा लागू केल्या, आमदार गोपीचंद पडळकर याच्यां प्रयत्नाला यश मिळाले. पुन्हा एकदा राज्यातील धनगर समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
२२ योजनेचा कसा लाभ घेता येईल,१० हजार घरकुल अनुदान योजना,इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मोफत प्रवेश,धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना सैनिक भरती प्रक्रिया आणि पोलीस भरती प्रक्रियासाठी तसेच स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण योजना, विभागीय स्तरावर वसतिगृह उभारणे ,मेंढपाळसाठी विविध योजना,अशा प्रकारच्या विविध योजनांचा समावेश आहे

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद