माडगुळेत गणरायाची उत्साहात स्थापना!
नंदकुमार विभुते
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माडगुळे
राज्यात कोरोना निर्बंध उठवल्यानंतर प्रथमच यावर्षी सार्वजनिक गणेश मंडळांनी व घरगुती स्वरूपात गणरायाची स्थापना उत्साहाच्या वातावरणात केली आहे.
निसर्गाच्या अवकृपेमुळे व हंगामात वेळेत पाऊस न पडल्यामुळे खरीप हंगामात घेतली जाणारी बाजरी व इतर कडधान्ये, तेलवर्गीय बियांची पिके यांचा पेरा न झाल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत होता. मात्र काल वातावरणात अचानक बदल झाल्यामुळे व गणरायाच्या आगमनाबरोबरच पावसानेही आपली हजेरी लावली. रात्रभर ठिकठिकाणी रिमझिम पावसाच्या सरी बरसत होत्या. काही ठिकाणी नेटका पाऊस झाला.त्यामुळे शेतकरी वर्गाच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे. त्यामुळे त्यांनी गणरायाचे पारंपारिक वाद्याच्या गजरात व गुलालाच्या उधळणीत गणरायाच्या मूर्तींची स्थापना केल्या.
माडगुळे परिसरात प्रामुख्याने नरवीर उमाजी नाईक तरुण मंडळ, खंडोबा मळा,ढेकणाई वस्ती,लिंगडेवस्ती, नसले मळा व खडक वस्ती या ठिकाणी तरुण मंडळांनी आपापल्या गणेश मूर्तीची स्थापना पारंपारिक पद्धतीने मोठ्या थाटात केली आहे.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद