प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
उपेक्षितांसाठी राजारामबापू उद्योग समुहाने आटपाडीत यावे म्हणून माजी मंत्री – आमदार जयंतराव पाटील साहेबांना साकडे घालणार असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक यांनी व्यक्त केले .
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार एक तास राष्ट्रवादी साठी” या उपक्रमाच्या माध्यमातून आज आटपाडी येथे सादिक खाटीक यांच्या निवासस्थानी गाव / प्रभाग भेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . राज्यातल्या नवव्या आणि आटपाडीतल्या आठव्या गाव – प्रभाग भेटीच्या बैठकीवेळी सादिक खाटीक बोलत होते .
सादिक खाटीक पुढे म्हणाले, आटपाडी, खानापूर सारख्या मागास, उपेक्षित, वंचित तालुक्यातील माता, भगिनी, विद्यार्थी, विद्यार्थीनी, युवक, युवती, वडिलधारी मंडळी, शेतकरी, कष्टकरी यांचे मन, मनगट, मस्तक बळकटीसाठी इस्लामपूरच्या राजारामबापू उद्योग समुहाच्या माध्यमातून चौफेर विकासाचे दालन या भागात सुरु झाल्यास, हा सर्व भाग राज्यात नव्हे, देशातही अग्रेसर ठरू शकतो . सांगली जिल्हा निर्मितीच्या पंचाहत्तरीत सर्व जिल्हाच, सर्वच क्षेत्रात देशात अव्वल आणणे हे माजी मंत्री – आमदार जयंतराव पाटील यांचे व्हीजन आहे .
उदयोग, व्यवसाय, कारखानदारी च्या माध्यमातून जयंत पाटील साहेबच आटपाडी सारख्या दुष्काळी तालुक्यात परिवर्तन आणू शकतात . इस्लामपूरच्या राजारामबापू उद्योग समुहातील साखर कारखाना, सुतगिरणी आटपाडी तालुक्यात उभारली जावी , दुधावर प्रक्रिया करणारी कारखानदारी उभारण्या बरोबरच, राजारामबापू बँकेच्या विविध शाखा सुरु केल्या जाव्यात . कासेगांव शिक्षण संस्थेच्या माध्यमातून इंजिनिअरींग, मेडीकल, शेती, इत्यादी शैक्षणीक विभागाची दालने आटपाडी तालुक्यात उभारली जावीत . हजारो लोकांच्या जीवनात परिवर्तन करण्यास उपयुक्त ठरलेले राजारामबापू ज्ञान प्रबोधीनीचे जयंत दारिद्रय निर्मूलन अभियान – मोहीम या भागात व्यापकतेने राबविली जावी . देशाच्या संरक्षण क्षेत्रात उपयुक्त ठरणारी शिक्षण व्यवस्था साकारण्या बरोबरच फळफळावळ, भाजीपाला, अन्नधान्य, लहान जनावरांचे मांस यावर प्रक्रिया करणारी कारखानदारीसाठी राजारामबापू उदयोग समुहच उपयोगी ठरू शकतो . लिज्जत पापड सारखा उद्योग अथवा अन्य ग्रामोद्योग, कुटीरोद्योग उभारणीसाठी ही राजारामबापू परिवारच उपयोगी ठरू शकतो . बेंगलोर मुंबई आर्थिक कॉरिडॉर सारखा आठ – नऊ हजार एकरावर साकारणारा, शेकडो उद्योंगाना चालना देणारा आणि १०० किमी परिसरात आर्थिक परिवर्तनाची सुबत्ता आणणारा नवा प्रकल्प आटपाडी लगत उभारला जाणे महत्वाचा ठरणार आहे. देश विदेशात विखुरलेल्या गलाई बांधवां सह लाखो माणदेशींना जोडू – आणू – नेवू शकणारी आणि आटपाडीतून जाणारी रेल्वे ही अस्तित्वात येण्यास आणि भव्यदिव्य कॉरीडॉरसाठी देशभर प्रिय असणारे जयंतराव पाटीलच उपयोगी ठरू शकतात . याकडे ही सादिक खाटीक यांनी लक्ष वेधले .
बचत गटांच्या उत्पादीत मालाला प्रशस्त विक्री व्यवस्था उपलब्ध होईल असे मध्यवर्ती ठिकाणी महिला विकास बचत भवन उभारले जाणे महत्वाचे असून या बचत भवन मध्ये पाचशे आसन क्षमतेचा महिलांसाठी प्रशस्त हॉल, महिलांच्या आरोग्य, व्यायामासाठी जिम, विश्रांती कक्षासह सुलभ प्रसाधन गृह यांचा समावेश असला पाहीजे आणि आयुष्याच्या संध्याकाळी परवड सुरु असलेल्या वृद्धांसाठी सर्व सोयी सुविधा युक्त वृद्धाश्रम आटपाडीची गरज बनली आहे . यासाठीही जयंतरावच, यशस्वी नेते ठरू शकतील असा आशावाद ही सादिक खाटीक यांनी शेवटी व्यक्त केला .
शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्व सामान्यांना मिळवून देण्यासाठी सादिक खाटीक पुढाकार घ्यावा, असे मत श्री. सिद्धनाथ देवस्थान ट्रस्ट मायणीचे चेअरमन खटाव – माण – आटपाडीचे नेते विकासराव देशमुख यांनी व्यक्त केले .
आटपाडी तालुक्याचे चित्र पालटण्यासाठी उद्योग धंद्याची शृंखला आटपाडी तालुक्यात उभी राहीली पाहीजे . दुष्काळी तालुक्यांसाठी फक्त जयंत पाटील साहेबच उपयोगी येवू शकतात . जयंतराव साहेबांना भेटण्यास जाणाऱ्या शिष्टमंडळात आम्हीही येवू असे मत राष्ट्रवादीचे आटपाडी तालुक्याचे नेते चंद्रकांत दौंडे यांनी व्यक्त केले .
तालुक्यातील विकास कामांवर चर्चा करण्यासाठी २५ महिला , पुरुष, युवक, युवतींचे शिष्टमंडळ इस्लामपूरला जयंत पाटील यांच्या भेटीसाठी येत्या पंधरवड्यात नेण्याचे, त्यासाठी त्यांचेकडून वेळ मिळविणेचे, यावेळी ठरविण्यात आले .
स्वागत व प्रास्तावीक रेश्मा बंडगर व आस्मा जमादार यांनी केले . अध्यक्षस्थानी इंजिनीयर असिफ कलाल साहेब हे होते . यावेळी विकासराव देशमुख, चंद्रकांत दौंडे, संजय मोटे, असिफ उर्फ बाबु खाटीक, अमीर खाटीक, रहिमान खाटीक, मनोज कवडे, इरफान शेख इम्रान शेख, रॉमी शेख, जयंत चोथे, समीर खाटीक, कलंदर खाटीक, नदीम खाटीक, समीर खाटीक , सोमनाथ जाधव, रेश्मा बंडगर, मुमताज खाटीक, आस्मा जमादार, जुलेखा खाटीक, समीना शेख, नसीमा शेख, शमा खाटीक, शाबेरा खाटीक, पारूमावशी जाधव, कोंदनबी शेख, तायराबी खाटीक, रशिदाबी खाटीक, शांताबाई लांडगे, सविता लांडगे, धनश्री लांडगे, प्राजक्ता कदम, राबियॉबसरी खाटीक, फरहीन खाटीक, इशरतजहाँ खाटीक इत्यादी अनेक जण उपस्थित होते. शेवटी असिफ उर्फ बाबू खाटीक यांनी आभार मानले.

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन