एलआयसीकडून कटरे यांच्या वारसांना मृत्यू दावा रक्कम प्रदान

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

आटपाडी तालुक्यातील कटरेवाडी येथील कै.दत्तात्रय ज्ञानू कटरे यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या वारसांना एल.आय.सी.शाखा विटा येथे कार्यरत असणारे विमा प्रतिनिधी व सीएम क्लब मेंबर सुनिल सरक यांच्या प्रयत्नातून १८लाख, २१ हजार ८०० रुपये मृत्यू दावा रक्कम तातडीने मंजूर करून प्रदान करण्यात आले.
एल.आय.सी.च का ?
या प्रश्नाचे उत्तर म्हणजे,
विश्वासाचे दुसरे नाव एल.आय.सी…!
याचा प्रत्यय एल.आय.सी.ऑफ इंडिया विटा शाखेमध्ये नुकताच आला.
जीवनविम्याचा मूळ हेतू म्हणजे एखादी दुर्दैवी घटना घडल्यानंतर त्या कुटुंबाला होणा-या आर्थिक नुकसानापासून संरक्षित करणे, हाच होय…!
एल.आय.सी. सर्व प्रकारचे दावे देण्यात संपूर्ण जगामध्ये अव्वल आहे. त्यातल्या त्यात मृत्युदाव्याचे महत्व हे फार वेगळे असते.
आटपाडी तालुक्यातील कटरेवाडी येथील कै.दत्तात्रय ज्ञानू कटरे यांची एल.आय.सी. विटा शाखेमध्ये १० लाख विमा रकमेची पॉलिसी सुरु होती. त्य‍ांचे नुकतेच १९.०८.२०२२ रोजी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.
विमा प्रतिनिधीचे महत्वाचे कर्तव्य बजावताना,विमाक्षेत्रातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय MDRT पुरस्कार ४ वेळा मिळविणारे, चेअरमन क्लब सदस्य विमाप्रतिनिधी कामथ (ता.आटपाडी ) चे माजी सरपंच सुनिल सरक यांनी अतिशय कार्यतत्परता दाखवत सदर पॉलिसीच्या वारसदार श्रीमती. संगिता दत्तात्रय कटरे यांची भेट घेऊन मृत्यू दाव्यासाठी आवश्यक सर्व कागदपत्रे दि.२६.०८.२०२२ रोजी विटा शाखेत सादर केली.
विटा शाखेमध्ये क्लेमस् विभागात कार्यरत उच्च श्रेणी सहायक प्रताप घाडगे व आशा सकट आणि सहायक विशाल बनकर य‍ांनी तत्परतेने सदर पॉलिसीच्या मृत्युदाव्याची प्रक्रिया पूर्ण करुन त्याच दिवशी रु.१८लाख, २१ हजार ८०० रुपये एवढी रक्कम वारसदार श्रीमती. संगिता दत्तात्रय कटरे यांच्या बँकखात्यामध्ये प्रदान केली.
याप्रसंगी विटा शाखेचे शाखाधिकारी सुनिल कोळी , आटपाडी एस.ओ.चे शाखाधिकारी अमित देशमुख , उपशाखाधिकारी दिलीप सूर्यवंशी आणि दुर्वांकुर परिवार प्रमुख, विटा शाखेचे अग्रमानांकित विकास अधिकारी किरण कलढोणे यांचे बहुमू्ल्य सहकार्य लाभले.
ज्यादिवशी विम्याची कागदपत्रे सादर केली, त्याच दिवशी मृत्यु दाव्याची रक्कम वारसदाराला मिळाली! अतिशय स्वच्छ, पारदर्शक आणि सर्वोत्तम सेवेमुळे एल.आय.सी.ची विश्वासार्हता दिवसेंदिवस, वर्षानुवर्षे आणखी वाढतच आहे.
एल.आय.सी. म्हणजे विश्वासार्हता हेच यातून अधोरेखित होत.
एल.आय.सी.ची कार्यप्रणाली व ग्राहकांचा एल.आय.सी.वरील दृढ विश्वास या जोरावरच एल.आय.सी.आज ०१ सप्टेंबर २०२२ रोजी ६६ वा वर्धापनदिन मोठ्या दिमाखात साजरा करीत आहे.
एल.आय.सी. सारख्या वंदनीय संस्थेला आणि समस्त ग्राहकांना एल.आय.सी. वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.