अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत
लोकनेते स्व.बी.आर (काका) शिंदे यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जत तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुजय उर्फ नाना शिंदे यांनी दिली.
दि. ८ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वा. मार्केट यार्ड येथील स्व.बी.आर (काका) शिंदे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे व रक्तदान शिबीराचे आयोजन सकाळी १० वाजता अनुकांचन, विजय कॉलनी, सातारा रोड जत होणार आहे. या कार्यक्रम उद्घाटन आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते होणार आहे. तसेच सायंकाळी स्वर साधना कोल्हापूर प्रस्तुत आठवण – भावगीत/भक्तीगीत कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रमोद पोतनीस व डॉ. मनोहर मोदी हे उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आयोजकाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद