प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडी गावच्या हद्दीत झरे- खरसुंडी रस्त्यावर राजमाता चौक येथे काही एक कारण नसताना नाव गाव विचारून लोखंडी रॉडने लाथाबुक्याने मारहाण करून जखमी केल्याची फिर्याद आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये देण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सचिन माने रा. घाणंद व इतर अनोळखी पाच व्यक्ती तसेच इतर काही अनोळखी लोक यांनी संगनमत करून दत्तू कुंडलिक हांडे (वय 34 रा. पारेकरवाडी ता. आटपाडी) व रविंद्र सोनाजी आवळे, सागर विठ्ठल बरकडे, बिरदेव बरकडे यांना काही एक कारण नसताना नाव गाव विचारून लोखंडी रॉडने, लाथाबुक्क्याने मारहाण करून जखमी केले असल्याची फिर्याद आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये देण्यात आले आहे. याबाबतचा तपास पोलीस हवालदार गावडे करीत आहेत.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या