प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
आटपाडी तालुक्यातील झरे गावच्या हद्दीत पडळकरवाडी फाटा येथे बिरुदेव बरकडे व त्याच्यासोबत अनोळखी इसमांनी मोटरसायकलवरून येऊन तरुणास मारहाण केल्याची फिर्याद आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली आहे.यामध्ये दोघेजण जखमी झाले आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आटपाडी तालुक्यातील झरे गावच्या हद्दीत पडळकरवाडी फाटा येथे सचिन मधुकर माने ,(वय २४) राहणार घाणंद ता. आटपाडी आले असता अचानकपणे एका मोटरसायकलवरून तीन अनोळखी व्यक्ती येऊन माने याच्या मोटारसायकलच्या समोरून मोटारसायकल आडवी मारली. तेव्हा माने यांनी मोटरसायकल आडवी का मारली असे विचारले.त्यावेळी मोटारसायकलवरील एक अनोळखी व्यक्तीने माने यांच्या गाडीची चावी व मोबाईल काढून घेतला. त्यानंतर मोटरसायकलवरून बिरुदेव बरकडे व त्याच्यासोबत अनोळखी सहा व्यक्ती येऊन त्यातील एका अनोळखी व्यक्तीने लोखंडी सळई माने यांच्या डोक्यात मारून जखमी केले. माने याच्या डोकीतून रक्त येऊ लागल्याने त्याचा भाऊ विशाल मधे आला तेव्हा अनोळखी व्यक्तीने त्याच्या हातातून लोखंडी सळई बिरुदेव बरकडे याने घेऊन विशाल माने यांच्या डोक्यात उजव्या बाजूस मारून जखमी केले. यावेळी माने याचा मित्र रत्नाकर मेटकरी भांडणे सोडवण्यासाठी मधे आला असता त्याला अनोळखी पाच व्यक्तींनी लोकांना शिवीगाळ करून दमदाटी केली, अशा स्वरूपाची फिर्याद आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये देण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार गावडे करीत आहेत.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या