
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
आटपाडी येथील श्रीमती वत्सलादेवी देसाई गर्ल्स हायस्कूलमध्ये स्वातंत्र्य सैनिकांचे मार्गदर्शन कार्यक्रमांतर्गत वीरमाता,वीरपत्नी, माजी सैनिकांचा सत्कार समारंभ
आयोजित करण्यात आला. आटपाडीच्या तहसीलदार बी.एस.माने कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.
वीरपत्नी फुलाबाई सुरेश चव्हाण, सुभेदार पांडुरंग देशमुख,मेजर बापुसाहेब सोन्नूर, वीरमाता सौ.कलाबाई सुखदेव पुतळे,वीरपिता सुखदेव पुकळे, जगन्नाथ पुकळे, सुभेदार रामचंद्र संदिपान देशमुख, सुभेदार तुकाराम देशमुख, पतंगराव गोविंद कदम, सुभेदार पांडुरंग सुबराव देशमुख, सुभेदार दिनकर निवृत्ती कदम, सुभेदार सुभाष कदम, माजी सैनिक रामचंद्र बाबर, सतीश मोहन विभुते, सुधाकर तानाजी चव्हाण, सुभेदार सुभाष कदम, वीरमाता,वीर पत्नी, माजी सैनिक यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.आटपाडी पंचायत समितीच्या वतीने त्यांना तिरंगा ध्वज देण्यात आला.
तहसीलदार बाई माने, गटविकास अधिकारी मनोज भोसले, प्रशांत चंदनशिवे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार,नायब तहसीलदार ढेरे, नायब तहसीलदार शिंंदे, केंद्रप्रमुख मैनाताई गायकवाड, संदिप चव्हाण मान्यवर उपस्थित होते.
सुभेदार कदम, विद्यार्थिनी किर्ती मोहन बडरे, शिक्षिका मुग्धा माडगूळकर यांनी मनोगत व्यक्त केले.स्वागत व प्रास्ताविक सोमनाथ पुजारी यांनी केले.भावना विभुते यांनी सूत्रसंचालन केले.सौ.आर.जे.सावंत यांनी आभार मानले.मुख्याध्यापिका सौ.विजयमाला मोकाशी,पर्यवेक्षक व्ही.सी.कदम,एन.आर.जाधव,एस.आर.देशमुख,आर.आर.खटके,व्ही.डी.केंगार,एन.बी.जावीर,पी.एल.पिसे,एन.एम.गुरव व सर्व शिक्षक-शिक्षिका,विद्यार्थिनी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.


संबंधित बातम्या
मोठी उपेक्षा पदरी आलेले खानापूरचे घरंदाज नेते – कै . किरणरावभैय्या माने
दै.प्रगल्भनायक,दि.04/06/2023 रोजीचा अंक
दै.प्रगल्भनायक,दि.03/06/2023 रोजीचा अंक