हफ्तेखोर संघटनांमुळे माळशिरस तालुक्यात अधिकारी परेशान अन् ठेकेदार हैराण !

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माळशिरस

माळशिरस तालुक्यातील बऱ्याच गावांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याची खूप मोठी दुरावस्था होती. त्यावरून लोकांची मोठी रहदारी होती. सर्वसामान्य जनता चांगल्या रस्त्याच्या प्रतीक्षेत होती. बऱ्याच प्रतीक्षेनंतर काही भागांमध्ये रस्त्याची कामे अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली , ठेकेदारांच्या व लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याने काही भागात रस्त्याची कामे मंजूर होऊन ती झाली सुद्धा. ते काम करण्यासाठी बऱ्याचवेळा तालुक्यातील ठेकेदार व लोकप्रतिनीधींना सोलापूरच्या वाऱ्या कराव्या लागल्या आहेत. रस्त्यांची कामे झाल्यानंतर नागरिकांमध्ये अगदीच आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
परंतु तालुक्यातील काही हफ्तेखोर संघटना ज्यांचा रस्ते करण्यामध्ये कसलाही वाटा नसताना झालेले रस्ते असेच का झाले ? विनाकारणांचे प्रश्न उपस्थित करून ठेकेदार आणि अधिकारी लोकांना धारेवर धरण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे अधिकारी आणि ठेकेदार हैरान झाले आहेत. जर असेच राहिले तर तालुक्यात ठेकेदार काम करण्यासाठी मिळणार नाही व अधिकारी संबंधित रस्ते मंजूर करताना विचार करतील. मग जनतेला बऱ्याच अडचणीला सामोरे जावे लागेल. तर अशा संघटनाबाबत सध्या सामान्य जनतेमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या संघटना आम्ही जनतेची सेवा करतो आहे. सामान्य लोकांना आमचा आधार आहे . असा अविर्भाव निर्माण करतात. परंतु प्रत्यक्षात मात्र एखाद्या अधिकाऱ्याला धारेवर धरून त्याच्याकडून आपला खिसा भरला की, जनतेचे काहीही सोयरसुतक संबंधित संघटनांना नसते .अशा संघटना तालुक्यात वाढीस लागल्या आहेत. यामुळे सामान्य जनतेला आधार मिळण्याऐवजी अशा लोकांमुळे जनतेची कामे मार्गी लागण्याऐवजी रखडली जात आहेत.

“मांडवे गावातील ५० फाटा या ठिकाणचा रस्ता गेल्या १७-१८ वर्षापासून विकासाच्या प्रतीक्षेत होता.पंचायत समिती व जिल्हा परिषदमधील बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने हा रस्ता मार्गी लागला. या रस्त्यावरून खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. रस्ता करण्यासाठी कोणीदेखील प्रयत्न केला नाही. परंतु झालेला रस्ता आम्हाला पैसे न देता कसा बनवला, यासाठी काही हफ्तेखोर संघटना संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरीत आहेत. परंतु त्यांच्या या कृत्यामुळे मांडवे गावात यापुढे रस्ते करावेत की न करावेत? असा प्रश्न लोकप्रतिनिधी व ठेकेदार आणि अधिकारी यांच्यासमोर उभा ठाकला आहे. अशा लोकांचा बंदोबस्त जनतेनेच करणे गरजेचे आहे.”
विठ्ठल पालवे
ग्रा.प.सदस्या, मांडवे

“मी गेल्या अनेक वर्षापासून सरकारी ठेकेदार म्हणून काम करीत आहे. बऱ्याच गावांमध्ये कामे केली.त्यापैकी मांडवे गावातील जे काम मी केले आहे, यावर काही समाजकंटक तक्रारी करून तो रस्ता निकृष्ट आहे, असा समाजामध्ये गैरसमज निर्माण करीत आहेत व तक्रारीचे अर्ज वरिष्ठ कार्यालयाला पोहोचवत आहेत. ज्यांना रस्त्यामध्ये काही कळत नाही, स्वतः समाज बिघडवणारे व्यवसाय करतात, मी त्यांना उघडपणे सांगतो की चांगल्या प्रतीचा इंजिनियर घेऊन या आणि तो रस्ता चेक करा.जर काही कमी सापडले तर तो रस्ता मी स्वखर्चाने परत करून देईन. परंतु चांगल्या माणसांना त्रास देणे योग्य नाही.”- सरकारी ठेकेदार

“मांडवे गावामध्ये मागील वर्षभरात बांधकाम विभाग उपअभियंता श्री.अशोकराव रनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली खुप विकासकामे झाली आहेत व सुरु आहेत, हे विरोधकांना पाहवत नसल्याने पैसे खाऊ अशा संघटनांना पुढे करुन विकासकामांना खिळ घालण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत. ज्या ५० फाटाच्या रस्त्याने चार चाकी गाडी जात नव्हती, शेतकऱ्यांचे ऊसाला रस्त्याकडे बघून कोणी तोड़ देत नव्हते, अशावेळी देवासारखे धावत येऊन रणवरे साहेबांनी पाठपुरावा करुन सदर रस्त्याच्या दुरूस्तीसाठी निधी उपलब्ध करुन दिला. त्याबद्दल आम्ही मांडवेकर त्यांचे जाहीर आभार मानतो. तसेच ज्या संघटनेचा न मांडवे गावच्या विकासाचा तीळमात्र संबंध नाही, त्यांनी उगाच पुळका आनु नका. मांडवे गावातील जनता अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभी आहे. त्यांच्या समर्थनार्थ लवकरच सह्याची मोहिम संपूर्ण गावातून राबवू व ह्या हफ़्तेखोरांना धड़ा शिकवू , तसेच अशा संघटना कायदेशीर आहेत का ?तपासणेपण तेवढेच गरजेचे आहे. एखादा रस्ता करण्यासाठी अशा संघटनांनी पाठपुरावा करणे गरजेचे आहे. तसं करण्याची त्यांना सद्बुद्धी मिळो.”
हनुमंत भिमराव टेळे
सरपंच, ग्रामपंचायत मांडवे