अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत
महिलेस लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार तसेच जातिवाचक शिवीगाळ केल्याने उटगी येथील एकावर अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिद्धेश्वर शरणाप्पा अंकलगी (वय २४, रा.उटगी, ता.जत) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना मंगळवारी रात्री दहा वाजता घडली.याबाबत पीडित महिलेने उमदी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
जत पूर्व भागातील एका गावातील ३० वर्षीय महिलेला सिद्धेश्वर अंकलगी याने लग्नाचे आमिष दाखवले. त्यातून तो २०१८ पासून ‘लगट’ करत होता. दरम्यान मंगळवारी रात्री पीडित महिला राहत, असलेल्या गावात जाऊन तिच्यावर बलात्कार केला. यावेळी पीडित महिलेने लग्नाबाबत विचारताच जातिवाचक शिवीगाळ केली व पुन्हा तुला जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. अंकलगी याच्या विरोधात उमदी पोलिसांत बलात्कार व जातिवाचक शिवीगाळ कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या