संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माळशिरस
माळशिरचे माजी सरपंच कै.बापूराव तुळशिराम शिद यांच्या ३६ पुण्यतिथी निमित्त दि. १७ जुलै रोजी मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिराचे उद्घाटन शुभारंभ पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते व नगराध्यक्ष डॉ.आप्पासाहेब देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व माजी उपनगराध्यक्ष शिवाजीराव देशमुख,
डीवायएसपी बसवराज शिवपुजे, पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड याचा प्रमुख उपस्थिती संपन्न होणार आहे.
या शिबीरात रक्तदाब तपासणी,रक्तातील साखर, ईसीजी,ज्यांना कोरोना झाला होता त्यांच्यासाठी फुफ्फुसांची कार्यक्षमता तपासणी, स्पायरोमेट्री तपासणी, आहाराबद्दल सल्ला, डोळ्यांची तपासणी, आदि तपासण्या करण्यात येणार आहेत. त्यासाठी डॉ. सचिन सावंत
व डॉ. शैलेश गायकवाड, डॉ.सुनील नरूटे, डॉ.आप्पासाहेब टेळे नेत्र तज्ज्ञ, तसेच तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात येणार आहेत. रूग्णांनी येताना जुने रिपोर्ट, फाईल्स, औषधे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याची कागदपत्रे बरोबर आणावीत, असे आवाहन आयोजक कै. बापूराव तुळशिराम शिद व पुण्यतिथी कार्यक्रम समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद