गोरडवाडी येथे उद्या स्व.माणिकबापूंच्या पुण्यस्मरणानिमित्त किर्तन,पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाचे आयोजन

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माळशिरस

गोरडवाडी ता.माळशिरस गावचे बुजुर्ग नेते स्व.माणिकराव बाबासो कर्णवर पाटील उर्फ माणिकबापू यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त उद्या शनिवार दि. २३ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेमध्ये कीर्तनकार ह.भ.प. अमोल सुळ महाराज, मोरोची यांचे सुश्राव्य किर्तन गोरडवाडी-म्हसवड मार्गावरील कर्णवर पाटीलवस्ती येथे होणार आहे. तरी मित्र परिवार व नातेवाईक यांनी उपस्थित रहावे, असे श्रीमती बाई माणिकराव कर्णवर पाटील, नवनाथ माणिकराव कर्णवर पाटील, मच्छिंद्र माणिकराव कर्णवर पाटील, चि. योगेश दाजीराम कर्णवर पाटील आणि समस्त कर्णवर पाटील यांच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.
माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील, महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, माढा लोकसभेचे माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील, विधान परिषदेचे आमदार युवा नेते रणजितसिंह मोहिते पाटील अशा मोहिते पाटील परिवारातील तीन पिढ्यांसोबत सलोख्याचे व जिव्हाळ्याचे संबंध असणारे माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील बुजुर्ग नेते माणिकबापू हे होते.इस्लामपूर गोरडवाडी संयुक्त ग्रामपंचायतीचे ते पाच वर्ष पहिले सरपंच होते.
गोरडवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटी मर्यादित गोरडवाडी या संस्थेवर ३५ वर्षे चेअरमन पदाची धुरा सांभाळली. माळशिरस पंचायत समितीचे सलग अकरा वर्ष उपसभापती पदावर कार्यरत होते. सोलापूर जिल्हा नियोजन समितीवर त्यांनी पाच वर्ष काम केले. श्री शंकर सहकारी साखर कारखाना सदाशिवनगर येथे पाच वर्ष संचालक पदावर होते. अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज येथे पाच वर्ष उपसभापती पदावर कार्यरत होते.माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात मोहिते पाटील यांचे विश्वासू सहकारी होते. माणिक बापूंनी आपल्या पदाचा उपयोग सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी केलेला होता. प्रतिकूल परिस्थितीत अनेक पदावर काम करण्याची संधी एकनिष्ठपणामुळे मिळालेली आहे.
कोरोना संसर्ग रोगाच्या प्रादुर्भावामुळे लोकांना बापूंच्या अंत्यविधी रक्षाविसर्जन व दशक्रिया विधीसाठी उपस्थित राहता आलेले नव्हते. सध्या कोरोना नियंत्रणात असल्याने प्रथम पुण्यस्मरण (वर्षश्राद्ध) निमित्त कीर्तन, पुष्पवृष्टी, आरती, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी मित्र परिवार व नातेवाईक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन गोरडवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक मच्छिंद्र कर्णवर पाटील आणि समस्त कर्णवर पाटील परिवार यांनी केलेले आहे.