वीज पडुन मृत्यूमुखी पडलेल्याच्या वारसांना मदत

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत

जत तालुक्यातील मौजे धुळेकरवाडी येथील मेघु सोमला राठोड यांचा मागील महिन्यात १० जून रोजी वादळी वाऱ्यात आकस्मिक वीज पडुन मृत्यू झाला होता. घरातील कर्ता माणूसच मृत्युमुखी पडल्याने संपूर्ण कुटुंब उघड्यावर आलं होतं.
त्यांना वेळीच मदत मिळणे आवश्यक असल्याने या घटनेची माहिती घेऊन तहसीलदारांनी राठोड कुटुंबियांना लवकरात लवकर शासकीय मदत मिळवून देण्याच्या सूचना केल्या होत्या. निधी उपलब्ध होताच राठोड कुटुंबियांना मदतीसाठी चार लाख रुपये उपलब्ध करून देत सदरच्या रकमेचा चेक आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते कै. मेघु सोमला राठोड यांच्याकडे पत्नी उमलाबाई मेघु राठोड यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार, जिल्हा परिषद सरदार पाटील, पंचायत समिती माजी सभापती बाबासाहेब (तात्या) कोडग,यांच्यासह बहुतांशी गावकरी उपस्थित होते.