
गारवाड पाटी ते इस्लामपूर रस्त्याची दुरुस्ती करा : सचिन पवार
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माळशिरस
गारवाडपाटी-इस्लामपूर-माणकी रस्ता खराब झाला आहे . हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असुन या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे .या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, जागोजागी पडलेल्या खड्यांमुळे हा रस्ता रहदारीस धोकादायक आणि त्रासाचा ठरत आहे. गारवडपाटी येथे लिटल एंजल इंग्लिश मीडियम स्कूल असल्याने शाळेत मुला मुलींना येता जाताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे . म्हणून सचिन पवार यांनी स्वखर्चानी गारवाडपाटी इस्लामपूर माणकी रस्ता खराब झाल्याने स्वतः जेसीबी लावुन पडलेले खड्डे पुर्ण भरून घेतले आहेत . त्यामुळे त्यांचे कौतुक केले जात आहे .
तालुक्याच्या ठिकाणापासून अवघ्या १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या या रस्त्याकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे. नागरिकांना नोकरी, व्यवसाय, मजुरी, दवाखाना, शिक्षण यासाठी दररोज ये-जा करावी लागते. मात्र या रस्त्याने दुचाकी नेणेच मोठे अवघड असून चारचाकी वाहन घेऊन जाणे म्हणजे मोठी कसरतच आहे. त्यामुळे सबंधीत प्रशासन व लोकप्रतिनिधींनी याकडे त्वरित लक्ष देऊन सदर रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी संस्थापक सचिन पवार यांनी केली आहे .
यावेळी सचिन पवार, नितीन यादव , आंबादास निबांळकर , गणेश रननवरे , निकित पाटील , विकास बुधावले सह मान्यवरानी सहकार्य केले .

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद