अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत
चोरोची गावचे समाजरत्न फौंडेशन म्हणजे सामाजिक जाणीव ठेऊन समाजप्रिय कामासाठी अग्रेसर असणारी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये जनसेवक अशी ओळख असणारे दत्ताभाऊ लोखंडे यांच्या संस्थेतर्फे विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
या संस्थेच्या माध्यमातुन युवकांना प्रेरणा देणाऱ्या अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. आपल्याच परिसरातील अनेक कर्तव्यदक्ष अधिकारी विविध पदावर कार्यरत असणारे व निवृत्त अधिकारी यांचा सत्कार करून आपल्या परिसरातील नवयुकांना त्यांच्या कामातून प्रेरणा मिळावी म्हणून सातत्याने समाजरत्न फाउंडेशन यांच्यामार्फत होत असते. याचाच भाग म्हणून नुकतेच PSI(फौजदार) पदाचे प्रशिक्षण पूर्ण करुन आलेले व मुंबई महानगरपालिका मधून वॉर्ड ऑफिसर म्हणून निवृत्त झालेले या सर्वच मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
सत्यशील पाटील(PSI),नवनाथ पाटील(PSI),लक्ष्मण सरगर(PSI) निवृत्त अधिकारी,शिवाजी यमगर,मुंबई महानगरपालिका या सर्वच मान्यवरांचा सत्कार सोहळा संपन्न झाला.
यावेळी कार्यक्रमास श्री.संभाजी खांडेकर,(युवा उद्योजक),संभाजी यमगर,पोस्ट-मास्टर हेमंत मराठे,युवा कीर्तनकार,दिगंबर पाटील,सॉफ्टवेअर इंजीनिअर्स योगेश लोखंडे,युवराज ओलेकर,सुनील मस्के आदी सहकारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद