रत्नत्रयची अन्नदानाची परंपरा कायम

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माळशिरस

आषाढी वारीसाठी निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची सेवा करण्याची गेल्या अनेक वर्षाची परंपरा सदाशिवनगर येथील रत्नत्रय परिवाराने जोपासली.
वारकऱ्यांना घरगुती जेवणाचा आस्वाद मिळावा या हेतूने गेले दहा वर्षापासून रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी सदाशिवनगर, रत्नत्रय ग्रामीण बिगर पतसंस्था सदाशिवनगर व रत्नत्रय परिवार सदाशिवनगर यांनी मा श्री अनंतलाल दादा दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवत आहेत.
अन्नदानाचे हे अकरावे वर्ष आहे. मंगळवार दिनांक पाच जुलै रोजी सकाळी दहा वाजता अन्नदान सुरू केले. या मध्ये बेसन भाकरी, मिरचीचा ठेचा, पोहे, फरसाणा,भडंग, भेळ आधीचा समावेश होता. सदर प्रसंगी रत्नत्रय एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री.अनंतलाल दादा दोशी, रत्नत्रय पतसंस्थेचे चेअरमन वीरकुमार दोशी, रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन प्रमोद दोशी, पतसंस्था सचिव ज्ञानेश राऊत, रत्नत्रय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य दैवत वाघमोडे सर, रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य अमित पाटील सर, विक्रम पालवे, आदी मान्यवर उपस्थित होते.
गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या अन्नदानातून मिळणारे समाधान मन तृप्त करत असल्याची भावना अनंतलाल दोशी यांनी व्यक्त केली.