उंबरगाव येथे भीम आर्मी संविधान रक्षक दल शाखेचे अनावरण

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
दिघंची

आटपाडी तालुक्यातील उंबरगांव येथे भीम आर्मी (संरद)च्या पहिल्या शाखेचे उदघाटन महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांच्या हस्ते करण्याात आले.
यावेळी जिल्हा संघटक जगन्नाथ वाघमारे, आटपाडी तालुका संपर्कप्रमुख अर्जुन वाघमारे, तालुका उपाध्यक्ष दामोदर बुधावले, उपसरपंच सुनील गाढवे, संघटनेचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.खरात सर यांनी मनोगत व्यक्त केले. किसन वाघमारे यांची शाखाप्रमुखपदी निवड करण्यात आली.अमित सावंत,सारंग सावंत,विश्वास सावंत,ऋषिकेश ऐवळे,बबलू वायदंडे, मोहन चव्हाण, जगन्नाथ सावंत, शैलेश सावंत यांची संघटकपदी नियुक्ती करण्यात आली. दौलत बुधावले यांनी आभार मानले.