उटगी येथील कोळी कुटुंबास उमाजीराव सनमडीकर मेडिकल फाउंडेशनची आर्थिक मदत

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत

जत तालुक्यातील गोरगरीब,निराधार, वेगवेगळ्या समाजातील कुटुंबावर नैसर्गिक आपत्ती किंवा इतर कारणामुळे ओढवलेल्या संकटातून सावरण्यासाठी, त्यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी “एक हात मदतीचा ” म्हणून जत तालुक्याचे कालकथित माजी आमदार श्री.उमाजीराव सनमडीकर काकांच्या स्मरणार्थ श्री.उमाजीराव सनमडिकर मेडिकल फाउंडेशन जत,च्या वतीने,’ सामाजिक कृतज्ञता निधी ‘ म्हणून रोख रक्कम देण्याची सुरुवात केली आहे .
25 जून 2022 रोजी उटगी गावातील शेतकरी श्री.धोंडाप्पा व्हन्नाप्पा कोळी यांनी कर्जास कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली होती.त्यांच्या कुटूंबाला आर्थिक पाठबळ म्हणून पत्नी श्रीदेवी कोळी यांच्याकडे रोखरक्कम स्वरूपात मदत करण्यात आली.यावेळी माजी सरपंच श्री.भीमराय बिराजदार, तंटामुक्त अध्यक्ष श्री.सिदराया संख,माजी पोलीस पाटील श्री. बसगोंडा पाटील, श्री. बसवराज संख, श्री. अण्णाप्पा बिराजदार, श्री. रायाप्पा निगडी, श्री. जावेद खानापुरे, श्री. प्रकाश टिळे, श्री. तम्माराया अचकनहल्ली, श्री. शिवाप्पा निगडी,संस्थेचे पदाधिकारी,मुख्याध्यापक पाटील सर तसेच उटगी गावातील समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.भविष्यात ही अशा अक्समित घटने प्रसंगी श्री.उमाजीराव सनमडीकर मेडिकल फाऊंडेशन च्या वतीने मदत करत राहण्याचा मानस डाॅ.कैलास सनमडीकर यांनी व्यक्त केला.