प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत
जत पूर्व भागातील भिवर्गी (ता. जत) येथील बोर नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू उत्खनन केलेल्या ट्रॅक्टर चालकाविरोधात महसूल विभागाने कारवाई केली. याप्रकरणी शिवानंद जगदेवी बिरादार याच्याविरुद्ध
उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गुरुवारी सकाळी घडली.
याबाबत माहिती अशी,जत पूर्व भागातील बोर नदीपात्रात अवैध वाळू उपसा सुरू आहे. शिवानंद बिरादार हा त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टरमध्ये विनापरवाना वाळू चोरून घेऊन जात होता. यावेळी तलाठी बबूवान शिंदे यांनी त्याला अटकाव केला. बिरादार याने ट्रॅक्टरसह पलायन केले. पोलिसात फिर्याद दिली आहे.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या