जाडर बोबलाद येथे भरदिवसा चोरी!

सोने-चांदी,रोकड लंपास

अनिल मदने

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क

जत
जत तालुक्यातील जाडर बोबलाद येथे रस्त्या

लगतगत असलेल्या(आवटीवस्ती) येथील बसवराज ईश्वरप्पा आवटी यांच्या शेतातील घरात दिवसाढवळ्या सुमारे एक लाख ९ हजार ५०० रुपयांची चोरीची घटना घडली. हा प्रकार नियोजन करून केलेला असल्याची स्थानिकामध्ये चर्चा आहे.
चोरी केलेली मालमत्ता पुढीलप्रमाणे- घरात असलेले आठ तोळे सोने, चांदी, २२ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण सुमारे एक लाख ९ हजार ५०० रुपये किंमतीचा माल अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे.
दिवसा शेतात कामासाठी गेले असल्याचे बघुन घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून तिजोरीतील सोने,चांदी, रोख रक्कम चोरी करून तिथून पलायन केले आहे.ही घटना दुपरी २ ते ५ वाजता घडला आहे.
याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी तातडीने उमदी पोलिसांनी धाव घेतली. रात्री उशिरपर्यंत चौकशी चालू होती. सांगलीतून तात्काळ श्वान बोलवून रात्री उशिरापर्यंत चौकशी चालू होती. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांनी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास उमदी ठाणेचे पोलिस उपनिरीक्षक शिरेश शिंदे करीत आहे.