प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
वरकुटे-मलवडी
माण तालुक्यातील भोजलिंग डोंगरावर वीज पडून मेंढपाळाचा मृत्यू झाला.संजय शिवाजी गोरड असे मृत मेंढपाळाचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, माण तालुक्यातील कापुसवाडी येथील मेंढपाळ संजय शिवाजी गोरड (वय ३५) हे मेंढपाळ भोजलिंग डोंगर परिसरात नेहमीप्रमाणे आपल्या दहा-बारा शेळ्या राखत होते. सायंकाळी वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट चालू झाला. अचानक साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्यांच्या अंगावर वीज पडून ते जागीच ठार झाले.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या