ती पाहतच बाळे,आमदारदादांचे चरण अडखळे!
तयांशी पुससी कळवळे,कोण्या जातसे शाळे!
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत
आमदार विक्रमसिंह सावंत हे बच्चे कंपनीत रमले.त्यांच्या साधेपणाचे कौतुक सर्व स्तरातून होत आहे.
आमदार विक्रम सावंत यांच्या साधेपणाची नेहमीच चर्चा असते. कधी अपघातग्रस्तांना मदत, तर कधी शेतकऱ्याच्या बांधावरून पेरणी. सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीला धावून जाणारे म्हणून त्यांची ओळख आहे. त्याचबरोबर जत तालुक्यात विकासकामांचे उद्घाटन सुरू असून आमदार विक्रमसिंह सावंत हे देवनाळ येथे विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी आले होते. त्यांच्यासोबत माजी सभापती बाबासाहेब कोडग, रामपूरचे माजी सरपंच मारुती पवार, काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष आप्पाराव बिराजदार, माजी नगरसेवक निलेश बामणे ,येळदरीचे सरपंच राम सरगर व ग्रामस्थ उपस्थित होते.
एका कट्यावर चिमुकली मुले आमदार विक्रमसिंह सावंत यांच्याकडे कुतुहलाने पाहत होती. तेवढ्यात आमदार विक्रमसिंह सावंत यांचे लक्ष त्या बच्चे कंपनीकडे गेले.आमदार सावंत थांबून त्या बच्चे कंपनीकडे जात “मुलांनो! काय चाललंय? कितवीला आहात? कोणत्या शाळेत शिकता?” अशी विचारपूस करू लागले. त्या मुलांना हस्तांदोलन करत ‘नीट अभ्यास करा’ असे सांगत आपल्या पुढील कार्यक्रमाकडे निघून गेले. आमदार दादांच्या या सहवासाने उपस्थित असलेल्या त्या बच्चे कंपनीचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याठिकाणी उपस्थित असलेले नागरिक आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या साधेपणाचे कौतुक करत होते.बच्चे कंपनीत रमणारे आमदार आम्ही कधी बघितले नाहीत,अशी चर्चा सुरू होती.
जमला होता बालगोपाळांचा मेळा,
आमदारदादांना लागला तयांचा लळा!

संबंधित बातम्या
मोठी उपेक्षा पदरी आलेले खानापूरचे घरंदाज नेते – कै . किरणरावभैय्या माने
दै.प्रगल्भनायक,दि.04/06/2023 रोजीचा अंक
दै.प्रगल्भनायक,दि.03/06/2023 रोजीचा अंक