
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
विटा
टेंभू-ताकारी योजनेने या भागाला तेज आले,असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी विटा येथे व्यक्त केले.विटा नगरवाचनालयाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त विटा-खानापूर तालुक्याच्या १५० वर्षांच्या ऐतिहासिक वाटचालीत योगदान दिलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवर, त्यांच्या वारसदारांचा स्नेहमेळावा संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी बोलताना जयंतराव पाटील पुढे म्हणाले, स्मृती सुगंध हा सुबक ग्रंथ उपलब्ध केलेला आहे.जो इतिहास विसरतो,त्याचे भविष्य अंध:कारमय होऊ शकते.ग्रंथात सर्वांच्य कालावधीचा बारकाईने उल्लेख केला आहे.असा ऐतिहासिक कामगिरीचा दस्तऐवज झाला की, तो कायमस्वरूपी राहतो. पूर्वीच्या काळात गोष्टी फार विचार करून जगात होत होत्या. ग्रंथात जुन्या वास्तूंचा विचार करण्यात आला आहे.
दुष्काळाशी सामना करत या भागातील जनता जगत होती. त्या मागे कोणी कोणी काय काय केलं होतं आणि परिस्थिती या सर्वांचा उल्लेख या दस्तऐवजात केला आहे.वास्तु, ऐतिहासिक जिल्हा, या सगळ्यांचाच आढावा घेतलेला आहे.खानापूर तालुक्यातील समृद्धी,परिस्थिती सर्वांसमोर येत आहे.
या परिसरातल्या लोकांनी दुष्काळाला, हालअपेष्टांना तोंड दिलं.आता पाण्यामुळे हा भाग समृद्ध होतोय. या भागातील शेतकरी आता पाण्यामुळे उत्तम शेती करताहेत. गलाई व्यवसायामुळे सोन्याचा धूर निघतोय. उसाचे उत्पादन घेऊन शेतकरी साखरेचा समृद्ध वारसा उभा करतील.
आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये, जगाच्या पाठीवर कुठेही जाऊन स्वतःचे विश्व निर्माण करू शकतो, हे येथील लोकांनी दाखवलं आहे.योग्य, विहित पद्धतीने प्रगती केल्याचा अट्टाहास व समृद्ध वारसा आहे, त्याची आठवण पुढच्या पिढीला माहिती झाल्यास तर त्यांची जिद्द टिकेल. ग्रंथ निर्मितीचे अलौकिक काम केले आहे.
ऐतिहासिक ग्रंथ घरात जतन करणे व पुढच्या पिढीला वाचण्यासाठी आग्रह करण्यात यावा. हा आपल्या भागातील संघर्षाचा नवा प्रकाश जिद्दीने तयार केला आहे.त्याचा वसा सर्वांच्यासमोर ठेवला आहे.
अँड.बाबासाहेब मुळीक यांनी प्रास्ताविक केले.ते म्हणाले, स्मृतीसुगंध पुस्तक तयार करताना कारकीर्दीचा आढावा तयार करण्यासाठी व भौतिक सुविधा याचा आढावा घेण्यासाठी संदर्भ गोळा केले. लोकसभा-विधानसभा,पंचायतीच्या निवडणुकांचा, उद्योग व्यवसाय यांचा व संस्थांचा आढावा घेतला आहे.
यावेळी मंत्री जयंतराव पाटील, राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम, सरसेनापती संताजी घोरपडे यांचे बारावे वंशज उदयराजे घोरपडे,अनिलभाऊ बाबर,माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, सदाशिवराव पाटील, यांच्यासह आबासाहेब पाटील,दत्ताजीराव देशमुख यांचे वारसदार, इंद्रजित दत्ताजीराव देशमुख, अँड.सुभाषराव पाटील, संपतराव माने यांचे वारसदार,शहाजीबापू पाटील यांचे वारसदार,संपतराव देशमुख यांचे वारसदार, लालासाहेब यादव,फुलचंद शहा, रामचंद्र लकडे, अशोकराव गायकवाड, अविनाश पाटील,विनोदभाऊ गुळवणी,कोंडीराम शेटे,वामन बर्वे,परिवार, विष्णु बळवंत सगरे,भाऊसाहेब भंडारे, रामभाऊ दिवटे,प्रतापशेठ साळुंखे, बाळासाहेब तारळेकर,किरणभाऊ तारळेकर, पत्रकार देवदत्त राजोपाध्ये, यांच्यासह अनेक मान्यवर व त्यांच्या वारसांचा सत्कार करण्यात आला.
ग्रंथ निर्मितीबद्दल बाबासाहेब मुळीक, धर्मेंद्र पवार यांचा सत्कार करण्यात आला.


संबंधित बातम्या
मोठी उपेक्षा पदरी आलेले खानापूरचे घरंदाज नेते – कै . किरणरावभैय्या माने
दै.प्रगल्भनायक,दि.04/06/2023 रोजीचा अंक
दै.प्रगल्भनायक,दि.03/06/2023 रोजीचा अंक