माळशिरसमध्ये विजयसिंह मोहिते-पाटील व डॉ.आप्पासाहेब देशमुख यांचा वाढदिवस साजरा

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माळशिरस

श्रीनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेज, माळशिरस या विद्यालयाच्या वतीने माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व व माळशिरस नगरपंचायतचे नगराध्यक्ष डॉ.आप्पासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबीर, जेष्ठ नागरिक सन्मान सोहळा व सर्पचित्र व माहिती प्रदर्शन आयोजित करण्यात आले.यावेळी माळशिरस व आसपासच्या परिसरातील कार्यकर्त्यांनी विद्यालयात सकाळपासूनच शुभेच्छा देण्यासाठी हार, फेटा, शाल तसेच विद्यार्थ्यांच्यासाठी १५५ डझन वही, ७६ पेन, पेन्सिल पाकिट व इयत्तानिहाय पुस्तके इत्यादी शैक्षणिक साहित्य घेऊन उपस्थिती लावली.यावेळी विद्यालयामार्फत रक्तदान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आकर्षक भेट वस्तू देण्यात आली. एकूण २२३ जणांनी रक्तदान केले.विद्यालयाकडून सर्वांना चहा, बिस्किट व नाष्टाची सोय करण्यात आली होती.
यावेळी माधव खांडेकर (मुख्याधिकारी, माळशिरस) अशोक घोळकर (ए.पी.आय), दयानंद कोकरे (वनपरिक्षेत्र अधिकारी माळशिरस) स्मिता शिंदे (वैद्यकीय अधिक्षक माळशिरस) उपनगराध्यक्ष शिवाजी देशमुख, नगरसेविका अर्चना देशमुख, ताई वावरे, मंगल गेजगे, कोमल जानकर, नगरसेवक विजय देशमुख, रघुनाथ चव्हाण, कैलास वामन, महादेव देशमुख, तुकाराम देशमुख, गणपतराव वाघमोडे, लक्ष्मण पवार, बाळासाहेब सरगर, गोरख देशमुख, रावसाहेब देशमुख, शिवाजी तुपे, महादेव माने, महेश बोत्रे, निलेश घाडगे, गौरव गांधी, बुवानाना धाईंजे, विकास धाईंजे, प्रितम देवकाते, किरण साठे, बबन देवकाते, राजाभाऊ देवकाते, सचिन वावरे, अनिल सावंत, आण्णा शिंदे, प्रविण केमकर, संतोष वाघमोडे, धनाजी देवकर, अजिनाथ वळकुंदे, वैभव जानकर, विलास काळे, सुनील मदने, पंपू मदने, सुमित जानकर, नामदेव कोळेकर, बाबासाहेब माने, हसन मुलाणी, अनिल देशमुख, अभिनंदन देशमाने, संजय गायकवाड, प्राचार्य योगेश गुजरे, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी बहुसंख्य पालक, ग्रामस्थ वर्ग उपस्थित होते.