पंढरीनाथ नागणेंचे राजेंद्रआण्णा देशमुख यांचेकडून अभिष्टचिंतन !

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

मंगलमुर्ती उदयोग समुह आटपाडीचे संस्थापक, उदयोगरत्न पुरस्कार विजेते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक श्री . पंढरीनाथ नागणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खानापूर आटपाडीचे आमदार राजेंद्रआण्णा देशमुख यांनी नागणे यांचा फेटा बांधून, शाल श्रीफळ देवून अभिष्टचिंतन केले .
बाबासाहेब देशमुख शेतकरी सह.सुतगिरणीच्या कार्यस्थळावर झालेल्या कार्यक्रमात नागणे यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले .
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक,साहित्यरत्न डॉ.शंकरराव खरात प्रतिष्ठानचे सचिव विलासराव खरात, दै.प्रगल्भनायक चे संपादक लक्ष्मणराव खटके, प्रसिद्ध उद्योजक सुरेशराव बालटे, सुतगिरणीचे संचालक आप्पासाहेब खरात, ज्येष्ट कवी – साहित्यिक अरविंद चांडवले, सामाजीक कार्यकर्ते विठ्ठलराव उर्फ हरी लांडगे, महादेवराव मेटकरी, विजय बनसोडे, दत्तात्रय जाधव इत्यादी अनेक जण उपस्थित होते
.