आ. समाधान अवताडे यांनी दिली मठाला भेट
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत
चिक्कलगी भुयार येथे श्री संत बागडे बाबाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत भक्तांची नेहमीच गर्दी असते. त्याचबरोबर हुलजंती, मंगळवेढा येथे जाण्यासाठी चिक्कलगी भुयार मारोळी (ग्रामीण मार्ग) हा एकमेव पर्याय आहे. परंतू या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या रस्त्याची डागडुजी करून रस्ता डांबरीकरण करावा,अशी मागणी चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी केली आहे.
मंगळवेढा-पंढरपूरचे आमदार समाधान अवताडे यांनी चिक्कलगी भुयार मठाला भेट दिली. मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी तुकाराम बाबा महाराज यांनी आ.अवताडे यांना श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या वतीने निवेदन दिले. निवेदनात नमूद केले आहे की, चिक्कलगी भुयार येथे श्री संत बागडे बाबाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत भक्तांची नेहमीच गर्दी असते. त्याचबरोबर
हुलजंती, मंगळवेढा येथे जाण्यासाठी चिक्कलगी भुयार मारोळी (ग्रामीण मार्ग) हा एकमेव पर्याय आहे. परंतू या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले आहेत. परिणामी अपघातांची संख्या वाढली आहे.प्रवाशांची, भाविकांची गैरसोय होत आहे.
चिक्कलगी भुयार मारोळी हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टिकोनातून दळणवळणाच्या सोयी व प्रवासी व भक्तांच्या संख्येचा विचार केला की, या रस्त्याची दर्जा उन्नती होऊन या रस्त्यासाठी जिल्हा मार्गाचा दर्जा मिळावा, तसेच या रस्त्याचे डांबरीकरण करणे गरजेचे आहे. हा रस्ता काटेरी झुडपांनी वेढलेला आहे. मोठमोठी रस्त्यावर खड्डे पडले आहेत.परिणामी अपघातांची संख्या वाढली आहे. चिक्कलगी भुयार मारोळी हाच रस्ता जत तालुक्यातील जाडरबोबलाद येथे जाणाऱ्या राज्य मार्गाला जोडला आहे. त्यामुळे या रस्त्याचा दर्जोउन्नती होणे गरजेचे आहे व रस्ता डांबरीकरण करणे, अतिशय महत्वाची बाब आहे. तरी याबाबत त्वरित संबंधित विभागांना आदेश देऊन अंदाजपत्रके प्रशासकीय मान्यता देऊन रस्त्याचे काम तत्काळ सुरू करावे.हन्नूर ते मारोळी या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. सात किलोमीटर अंतरातील पूर्णपणे रस्ता खराब झालेला आहे.
त्यामुळे भाविकांची प्रवाशांची गैरसोय होत आहे. खड्डे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अपघाताची संख्या वाढली आहे. त्याचबरोबर बिरोबा देवस्थान ते मारोळी,चिकलगी भुयार मठ ते हुलजंती येथील महालिंगराया देवस्थानकडे जाणारा रस्ता या दोन्ही रस्त्याने विशेष लक्ष घालून निधी उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी केली आहे.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद