प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
अहमदनगर
अहमदनगर शब्दगंध साहित्य परिषदेच्यावतीने दिला जाणारा साहित्य पुरस्कार रघुराज मेटकरी यांच्या ‘स्वातंत्र्य लढ्यातील सुवर्ण रत्ने’ या पुस्तकास जाहीर झाला आहे.शाल,श्रीफळ,सन्मानपत्र, शील्ड व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे.अहमदनगर मध्ये ११ जून,२०२२ रोजी पुरस्काराचे वितरण साहित्यिक व वक्ते डॉ.संजय कळमकर यांच्या हस्ते होणार आहे. शब्दगंध साहित्य परिषदेचे संस्थापक प्रा.सुनील गोसावी यांनी ही माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केली आहे.
रघुराज मेटकरी यांची रानजाई, आभाळमाती, माणदेशी बंड,स्वाभिमान,डॉ.होमी भाभा,सिद्धयोगी गजानन, चैतन्याचे चांदणे,माझे विद्यार्था, सह्याद्रीच्या खोऱ्यात,नोबेल विजेते विज्ञान तपस्वी व अनेक बालवाड्मयाची पुस्तके प्रकाशित आहेत.
विटा येथे रघुराज मेटकरी गेल्या चाळीस वर्षांपासून ग्रामीण मराठी साहित्य संमेलन भरवितात. त्यांना यापूर्वी अनेक राज्यस्तरीय साहित्यिक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना अहमदनगर साहित्य पुरस्कार मिळाल्याबद्दल विटा व विटा परिसरातील साहित्यिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संबंधित बातम्या
मराठी साहित्य मंडळाचा ‘समाजभूषण पुरस्कार’ प्रमोद तरळ यांना जाहीर
माडगुळे येथे उद्या शिदोरी साहित्य संमेलन
चिंचणी यात्रेनिमित्त आटपाडी आगारातर्फे जादा बसगाड्यांचे बुकिंग सुरु