प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
आटपाडी तालुक्यातील आणखी एका गावात २८ वर्षीय विवाहित तरुणीला चुलतदीराने घराच्या स्लॅबवर हात धरून मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याची घटना घडली. तिच्या दिरास मारहाण व सासूला शिवीगाळ केली. याबाबतची फिर्याद आटपाडी पोलिस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांकडून याबाबत मिळालेली माहिती अशी की, आटपाडी तालुक्यातील एका गावामध्ये २८ वर्षीय विवाहीत तरुणीला तिच्या चुलतदिराने घराच्या स्लॅबवर हात धरून मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तिच्या दिराला सदरची भांडणे मिटवायची आहेत, असे सांगून घरी बोलवून घेतले. संशयित आरोपी चुलतदीराने लाकडी दांडक्याने तिच्या दिराच्या डाव्या हातावर मारून जखमी केले. तसेच संशयित आरोपीच्या भावाने त्यांना पकडून ठेवले होते. त्यावेळी संबंधित महिला भांडणे सोडवत असताना त्यांनी तिच्या सासूला शिवीगाळ करून बघून घेण्याची धमकी दिलेली आहे. याबाबत दोघांविरुद्ध आटपाडी पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद देण्यात आली असून घटनेचा तपास पोलीस नाईक लोखंडे करीत आहेत.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या