आटपाडी तालुक्यात विवाहित तरुणीचा विनयभंग ?

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

आटपाडी तालुक्यातील एका गावामध्ये २७ वर्षीय विवाहित तरुणीच्या घरात जाऊन तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत कानाखाली मारून जाब विचारण्यास गेलेल्या तिच्या पतीस जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. याबाबतची फिर्याद आटपाडी पोलीस ठाण्यांमध्ये दिली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आटपाडी तालुक्यातील एका गावातील विवाहीत तरुणी घरी एकटी असताना अभिजीत उर्फ नानासो विठ्ठल जावीर हा तिच्या घरात गेला. ‘तु मला आवडतेस, तू खूप छान दिसतेस’ असे म्हणून तिची साडी धरून ओढू लागला. त्याने तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन कानाखाली मारले. महिलेचा पती त्यास जाब विचारण्यास गेला असता त्यांनाही शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.याबाबतची फिर्याद संबंधित महिलेने आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये दिली असून हा संशयित आरोपी आटपाडी तालुक्यातीलच आहे.घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक माने करीत आहेत.