प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
दिघंची येथे अज्ञात व्यक्तीने दोन शेळ्या, एक पाट व एक बोकड रात्रीचे चोरून नेल्याची घटना घडली. याबाबतची फिर्याद उमेश पाटील यांनी आटपाडी पोलीस ठाण्यांमध्ये दिली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दिघंची येथे दिनांक ३ रोजी रात्री १०.०० ते पहाटे ५.३० दरम्यानच्या काळात उमेश पांडुरंग पाटील (वय २४, रा.गवरचिंच मळा ता.आटपाडी जि.सांगली यांच्या दिघंची येथील घरासमोरुन दोन शेळ्या, एक बोकड व एक पाट असे अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहेत. यामध्ये काळ्या रंगाची पुढील दोन्ही पायात पांढरा रंग असलेली तीन हजार रुपये किमतीची शेळी, काळ्या रंगाची गळ्याच्या खाली गलुले असणारी पोटाच्या खाली पांढरा पट्टा असलेले दोन हजार रुपये किमतीची एक पाट, काळ्या रंगाची तीन हजार रुपये किमतीची शेळी, दोन हजार रुपये किमतीचे काळ्या रंगाचे लांब कान असलेले एक बोकड असे एकूण १० हजार रुपये किमतीचे हे पशुधन चोरून नेले आहे. याबाबतची फिर्याद उमेश पाटील यांनी आटपाडी पोलिस ठाण्यांमध्ये दिली असून पोलीस हेड कॉन्स्टेबल कदम पुढील तपास करीत आहेत.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या