अंडी विकताना बहाणा करून मोटरसायकलवर पळवून नेऊन केले कृत्य!
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
आटपाडी येथे शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ८३ वर्षीय वृद्ध महिलेला अंडी विकत असताना अंडी खरेदी करण्याच्या बहाण्याने गाडीवर बसवून पिंपरी खुर्द येथील फॉरेस्टमध्ये नेऊन अंगावरील दागिने व रोख रकमेसह साहित्य लुटल्याची घटना घडले. याबाबतची फिर्याद जनाबाई सुखदेव नागरे यांनी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे.
आटपाडी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जनाबाई सुखदेव नागरे (वय ८३ या. नांगरेमळा ता. आटपाडी जि.सांगली) या शनिवार दिनांक ४ रोजी दुपारी दीड वाजता आटपाडी येथील थियटर चौकात अंडी विकत असताना अनोळखी इसम त्यांच्याजवळ आला व त्याने अंडी घ्यायची आहेत असा बहाणा केला. त्याने आणलेल्या स्प्लेंडर गाडीवर बसवून गुलाल कलेक्शन रोडने देशमुखवाडीवरून पिंपरी खुर्द फॉरेस्टमध्ये नेले.तेथे त्याने जबरदस्तीने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, बोरमाळ, वायरच्या पिशवीत ठेवलेले सात हजार रुपये आधारकार्ड, रेशनकार्ड व अंडी यासह पिशवी काढून घेतली. त्या ओरडत असताना त्याने उजव्या कानातील फुले,वेल व झुबे हिसका मारून ओढले. त्यामुळे त्यांच्या उजव्या कानाला दुखापत झालेली आहे.
यामध्ये ७ हजार रुपये किमतीचे १५ ग्रॅम वजनाचे पिवळ्या धातूचे मणी-मंगळसूत्र, ५ हजार रुपये किमतीचे १० ग्रॅम वजनाची पिवळ्या धातूची बोरमाळ, ५ हजार रुपये किमतीचे ५ ग्रॅम वजनाचे एका कानातील पिवळ्या धातूचे वेल,फुले, झुबे, ७ हजार रुपये रोख रक्कम व दीडशे रुपयांची कोंबडीची अंडी असा एकूण २४ हजार १५० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.याबाबतची फिर्याद आटपाडी पोलिस ठाण्यांमध्ये देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या