विभुतवाडी येथील अपघातात दोघांचा मृत्यू

छोटा हत्ती व बोअरवेल वाहतूक करणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

विभूतवाडी ता.आटपाडी येथे कराड-पंढरपूर महामार्गावर बोरवेल वाहतूक करणारा ट्रक व छोटाहत्ती – एम एच 05-बीएच 3414 यांची समोरासमोर धडक होऊन तिघेजण जखमी झाले. त्यातील एकाचा मायणी हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असताना मृत्यू झाला. दुसऱ्याचा आटपाडी ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यु झाला.तर जखमी निशांत फडतरे हा सातारा येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.
तिघेही कोरेगावचे असून शेतकरी कृषी यंत्र नावाने त्यांचे दुकान आहे. दुकान साहीत्य पोहोचवण्यासाठी ते या भागामध्ये आले होते. परंतु परत जाताना गावाच्या नजीकच पूल आहे.त्या पुलावर अचानक वळण आहे. त्या वळणावरती समोरा समोर धडक झाली. तिघेही छोट्या हात्तीमध्ये पुढे बसलेले होते. त्यामुळे ते अतिशय गंभीर जखमी झाले होते.
ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आले. आटपाडी आणि मायणी येथील रुग्णवाहिका त्वरित आल्या. त्या रुग्णवाहिकेमध्ये एकाला आटपाडी रुग्णालयमध्ये नेण्यात आले तर दुसऱ्याला मायणी येथील रुग्णालयात नेण्यात आले. निशांत फडतरे याला सातारा येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले.
कराड-पंढरपूर महामार्ग असल्याने रस्ता चांगला झाला असल्याने वाहने अतिशय गतीने येत असतात.गावाच्या पश्चिमेला गावालगतच ओढ्यावर पूल आहे. त्या पुलानजीक मोठे वळण आहे. या वळणवर हा चौथा अपघात आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने हे वळण त्वरित काढावे व तेथे रस्ता सरळ करावा अशी ग्रामस्थांतून मागणी होत आहे.