जागतिक सायकल दिनानिमित्त माळशिरस येथे भव्य सायकल रॅली

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माळशिरस

नेहरु युवा केंद्र तसेच गुरुकुल अकॅडमी माळशिरस यांच्या संयुक्त विद्यमाने माळशिरस येथे सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड,गणपतराव वाघमोडे,जेष्ठ पत्रकार वाघंबरे,चांडाळ चौकडीच्या करामती वेब सिरीज मधील सिने कलाकार रामभाऊ ऊर्फ रामदास जगताप, पाटील ऊर्फ प्रा.विष्णु भारती,तसेच पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष रावसाहेब वाघमोडे, तालुका समन्वयक नेहरु युवा केंद्र सौ.मोहिनी वाघमोडे,स्पर्धा विश्व अभ्यासिका संचालक विनायक शिंदे, सायकल प्रेमी पांडुरंग माने, दादा वाघमोडे ,सुरेश वाघमोडे आदि मान्यवर उपस्थित होते .
हनुमान मंदिर माळशिरस ते तहसील कार्यालय माळशिरस रॅली काढून जनजागृती अभियान राबविण्यात आले.सदर रॅलीमध्ये ७३ युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.गुरुकुल अकॅडमीच्या वतीने टि शर्ट वाटप करण्यात आले.
यावेळेस बोलताना पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी सायकल चालवण्याचे फायदे सांगून युवकांना सायकल वापरण्याबाबत मार्गदर्शन केले.
तसेच नेहरु युवा केंद्रा मार्फत युवकांच्या सर्वागीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून याचा लाभ युवकांनी घ्यावा.
-मोहिनी वाघमोडे,तालुका समन्वयक नेहरु युवा केंद्र