अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत
जत तालुक्यातील अचकनहळळी गावच्या सुकन्या श्रीमती विजयमाला कदम यांच्या वाढदिवसानिमित्त दि.2 जून रोजी मोफत सर्वरोग निदान शिबीर व उपचार अचकनहळळी येथे आयोजित करण्यात आले आहे. मोफत आरोग्य शिबीर ग्रामपंचायत अचकनहळळी ,भारती विद्यापीठ परिवार , सिद्धेश्वर देवस्थान कमिटी अचकनहळळी यांनी नियोजन केले आहे.
यानिमित्त हळदी कुंकू सोहळा आयोजित केले जाणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार विक्रमदादा सावंत, अध्यक्ष प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे, तहसीलदार जीवन बनसोडे, पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे, तालुका आरोग्य अधिकारी संजय बंडगर उपस्थित राहणार आहेत.तर प्रमुख उपस्थिती विक्रम फाउंडेशनच्या संचालिका सौ वर्षाताई विक्रमसिंह सावंत, तालुका क्रीडा अधिकारी सौ स्मिता पाटील यांची प्रमुख उपस्थित होणार आहेत.
तरी या शिबिराचा पंचक्रोशीतील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद